महाशिवरात्रीनिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ५० हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन !

जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे, २० फेब्रुवारी (वार्ता.) – महाशिवरात्रीनिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन व्याख्याने आदी माध्यमांतून व्यापकस्तरावर धर्मप्रसार करण्यात आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ५ हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. काही ठिकाणी मान्यवरांनीही प्रदर्शनाला भेटी दिल्या.

सासवड येथील श्री चांगावटेश्वर महादेव मंदिर, गावठाण केंद्रातील ओंकारेश्वर मंदिर, हडपसर येथील निळकंठेश्वर मंदिर, धायरी येथील धायरेश्वर मंदिर, नसरापूर येथील श्री बनेश्वर मंदिर, तळेगाव येथील सिद्धेश्वर मंदिर, कोथरूड येथील श्री मृत्यूंजयेश्वर मंदिर, मंचर येथील श्री तपनेश्वर महादेव मंदिर, औंध येथील श्री निळकंठेश्वर मंदिर यांसह ५० हून अधिक मंदिरांमध्ये कक्ष उभारले होते.

मान्यवरांनी दिलेल्या भेटी

कोथरूड येथे ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना सौ. मंजुश्री खर्डेकर
कोथरूड येथील प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

१. मंचर – येथील श्री तपनेश्वर महादेव मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला खेड शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सदिच्छा भेट दिली. यासह भाजपच्या शहराध्यक्षा सौ. जागृती महाजन, भाजपच्या सौ. स्वप्ना पिंगळे, आर्.जी. मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन लष्करे, विश्व हिंदु परिषदेचे मंचरचे शहराध्यक्ष गणेश राऊत यांनीही प्रदर्शनाला भेट दिली.

 

२. हडपसर – येथील पिठेश्वर महादेव मंदिर येथील कक्षाला भाजपचे नगरसेवक मारुति आबा तुपे यांनी भेट दिली, तसेच तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. जमेल तेवढे साहाय्य करेन. ‘तुम्ही कक्ष पुष्कळच चांगला मांडला आहे’, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. काळेपडळ येथील श्री राधाकृष्ण मंदिराचे विश्वस्त मेजर सुधीर जगताप यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली.

चिंचवड येथील प्रदर्शन कक्षाला भेट देतांना जिज्ञासू
जिज्ञासूना ग्रंथाची माहिती सांगताना

३. विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री आणि सासवड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती आनंदी जगताप, तसेच श्रीमती जगताप यांचे जेष्ठ चिरंजीव तसेच मध्यप्रदेश येथील महू शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्री चांगावटेश्वर महादेव मंदिरातील सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन कक्षाला भेट दिली.

४. पिंपरी चिंचवडच्या माजी उपमहापौर सौ. शैलजा अविनाश मोरे यांनी श्रद्धा गार्डन येथील ग्रंथप्रदर्शनाला, तसेच नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) अर्चना मुसळे, माजी नगरसेविका सौ. संगीता गायकवाड यांनी औंध येथील कक्षाला भेट दिली.

५. विद्यावाचस्पती श्री. विद्यानंद यांनी जरशेश्वर मंदिर येथील कक्षाला भेट देऊन साधकांशी संवाद साधला. मांडवी गावचे माजी उपसरपंच नामदेव जाधव यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन  धर्मकार्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

६. कोथरूड – मधील मृत्यूंजयेश्वर मंदिरातील कक्षाला माजी नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी भेट दिली.

७. दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई पवळे यांनी ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

८. नसरापूर येथील बनेश्वर मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना पाणी वाटप केले. या ठिकाणी धर्मशिक्षण विषयक फलकाचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.