Bangladesh President Appeal : (म्‍हणे) ‘बांगलादेशाच्‍या प्रगतीसाठी सर्व धर्मांच्‍या लोकांनी धार्मिक मूल्‍यांचा वापर राष्‍ट्राच्‍या उन्‍नतीसाठी करावा !’

हिंदु धर्मियांवरील अत्‍याचारांविषयी अवाक्षरही न काढणारे राष्‍ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे फुकाचे विधान

बांगलादेशाचे राष्‍ट्रपती महंमद शहाबुद्दीन

ढाका – बांगलादेशाचे राष्‍ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी नुकतेच बांगलादेशाच्‍या प्रगतीसाठी सर्व धर्माच्‍या लोकांना एकत्र काम करण्‍याचे आवाहन केले. दुर्गापूजा उत्‍सव आणि मूर्ती विसर्जन कार्यक्रमाच्‍या निमित्ताने त्‍यांनी हे आवाहन केले. धार्मिक मूल्‍यांचा वापर राष्‍ट्राच्‍या उन्‍नतीसाठी झाला पाहिजे, असे ते या वेळी म्‍हणाले. (बांगलादेशाच्‍या राष्‍ट्रपतींनी नुसते आवाहन करून न थांबता दुर्गापूजा पंडालवर आक्रमण करून दुर्गादेवीच्‍या मूर्तींची तोडफोड करणार्‍या धर्मांधांच्‍या विरोधात कठोर कारवाई करून धार्मिक मूल्‍यांची जपणूक केली पाहिजे ! – संपादक)

बंगभवन येथील दुर्गापूजा सोहळ्‍याच्‍या वेळी त्‍यांनी जाती-धर्माचा विचार न करता सर्व नागरिकांनी एकत्र येऊन विकसित आणि समृद्ध राष्‍ट्र निर्माण करण्‍यासाठी काम करण्‍याचे आवाहन केले. ते म्‍हणाले, ‘‘आपण सर्व जण बांगलादेशी आहोत. आपल्‍या देशात बहुसंख्‍य किंवा अल्‍पसंख्‍याक असा भेदभाव नाही. बांगलादेशाला विकसित, समृद्ध आणि भेदभावमुक्‍त देश बनवण्‍यासाठी सहिष्‍णुता, परस्‍पर विश्‍वास अन् सहकार्य यांची आवश्‍यकता आहे. दुर्गापूजा ही बंगाली परंपरा आणि संस्‍कृती यांच्‍याशी निगडित आहे. हा केवळ धार्मिक सणच नाही तर सामाजिक उत्‍सवही आहे. सर्वांच्‍या सामूहिक सहभागाने हा उत्‍सव सार्वत्रिक झाला आहे.’’

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील मुसलमान त्‍यांच्‍या धार्मिक मूल्‍यांचा वापर हिंदूंना संपवण्‍यासाठी करत आहेत, याविषयी बांगलादेशाचे राष्‍ट्रपती तोंड का उघडत नाहीत ?