श्रीरामाचे गाणे म्हणणार्या मेट्रोमधील प्रवाशांवर अभिनेत्री पूजा भट्ट यांची टीका
मुंबई – नवरात्रोत्सवाच्या काळात मुंबई मेट्रोमधून प्रवास करणार्या प्रवाशांचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. त्यात प्रवासी मेट्रोमध्ये खाली बसलेले असून ते ‘भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा’ या गाण्यासह गरब्याची गाणी गातांना दिसले. यासंदर्भात अभिनेत्री पूजा भट्ट यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ प्रसारित करत लिहिले, ‘‘सार्वजनिक ठिकाणी हे सर्व करण्याची अनुमती कशी मिळते ? मग ते हिंदुत्व पॉप असो, ख्रिसमस कॅरोल, बॉलीवूड ब्लॉकबस्टर किंवा काहीही असो, काही फरक पडत नाही. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणांचा अशा प्रकारे गैरवापर करता येणार नाही. प्राधिकरणाने याची अनुमती कशी आणि का दिली ? जर आपण मूलभूत नियमांचे पालन करू शकत नसाल, तर खर्या अर्थाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा नाही. सर्वच राजकीय पक्षांच्या अवैध होर्डिंग्समुळे शहर प्रदूषित होते, मेट्रोचे पार्टी झोनमध्ये रूपांतर होत आहे. आक्रमणकर्ते फटाक्यांच्या आडून गोळ्या झाडत आहेत.’’
‘How do they allow singing Shri Ram’s song in public places?’ – Actress #PoojaBhatt criticizes the passengers singing in the #MumbaiMetro
👉 Such active criticism is never heard from her when Namaz is offered in Mumbai locals, or when ‘Bharat Tere Tukde Honge’ chants are raised… pic.twitter.com/WUhIzeWX6p
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 14, 2024
नागरिकांचे प्रत्युत्तर !
पूजा भट्ट यांच्या पोस्टवर प्रत्युत्तर देत एकाने लिहिले, ‘मला वाटले की, तुमचा ‘बिग बॉस’मधील (एक प्रकारचा रिअॅलिटी शो (वास्तवदर्शी कार्यक्रम) मित्र एल्विश यादव याने हिंदुत्ववादी देशात व्यवस्था कशी चालते ? याविषयी तुम्हाला ज्ञान दिले आहे.’ अन्य एक जण म्हणाला, ‘आधी प्रवास कर, मग तूसुद्धा या लोकांमध्ये सहभागी होशील.’
संपादकीय भूमिका
|