भारतियांनी लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये केली ‘शिवजयंती’ साजरी !

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या ‘संसद चौकात’ !

पुणे – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये साजरी करण्यात आली. लंडन येथे शिक्षणाकरता गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी भारतीय विद्यार्थी, मित्र आणि देशातील विद्यार्थी यांसह ‘शिवजयंती’ साजरी केली. लंडन शहरात भारतीय संस्कृती जोपासत भारतातील अनेक राज्यांतील विद्यार्थी या वेळी अधिवक्ता संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याकरता एकत्र आले होते.

(सौजन्य : ABP MAJHA)

अधिवक्ता संग्राम शेवाळे यांनी सांगितले की, शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशांतील अभ्यासक भारतात येतात आणि हीच महाराष्ट्राची परंपरा आम्ही जोपासत शिवाजी महाराज यांना लंडनच्या संसद चौकात वंदन केले.