भीमा नदीपात्रात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची साकारण्यात आली प्रतिकृती !

कौठाळी (जिल्हा सोलापूर) – शिवजयंतीच्या निमित्ताने येथील भीमा नदीपात्रात मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभु श्रीराम यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. येथील श्री. प्रवीण नगरे आणि त्यांचे बंधू सूरज नगरे यांनी या प्रतिकृती उभ्या केल्या आहेत.

 (सौजन्य : AB Marathi News)

छत्रपती शिवराय आणि प्रभु श्रीराम या योद्ध्यांचा पराक्रम अनमोल आहे. यासाठी त्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असल्याचे नगरे यांनी सांगितले. प्रतिकृतींच्या दर्शनासाठी भोई समाजाच्या वतीने विनामूल्य होडीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतिकृती पहाण्यासाठी शिवजयंतीच्या दिवशी आबालवृद्ध आणि शिवप्रेमी यांनी मोठी गर्दी केली होती.