उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही शिवसेनेचा पक्षादेश लागू असेल ! – भरत गोगावले, पक्षप्रतोद, शिवसेना

श्री. भरत गोगावले, पक्षप्रतोद, शिवसेना

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षाच्या सर्व ५६ आमदारांना पक्षादेश काढला जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही हा पक्षादेश लागू असेल. त्याचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे विधानसभेतील पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले. ‘संजय राऊत यांच्या तोंडाला लगाम राहिलेला नाही. ते उद्धव ठाकरे यांना संपवण्याचे काम करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची चर्चा आमच्या बैठकीत झाली आहे’, असे गोगावले यांनी या वेळी सांगितले.