मुंबई – राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे वर्ष २०२४ या वर्षाचे सांस्कृतिक धोरण घोषित केले आहे. या धोरणाच्या कार्यवाहीसाठी राज्य सांस्कृतिक धोरण कार्यवाही समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला राज्यशासनाने राज्यमंत्रीदाचा दर्जा दिला आहे.