युक्रेनच्या प्रमुख कमांडरला पदावरून हटवले !

मेजर जनरल एडवर्ड मिखाइलोविच मोसकालोव

कीव (युक्रेन) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेंस्की यांनी त्यांच्या सैन्याच्या जॉइंट फोर्सचे कमांडर मेजर जनरल एडवर्ड मिखाइलोविच मोसकालोव यांना पदावरून हटवले आहे. त्यांची गेल्या वर्षी मार्चमध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना पदावरून का हटवण्यात आले, याचे कारण सरकारकडून देण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी सरकारने भ्रष्टाचार विरोधात कारवाई करतांना अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना हटवण्यात आले होते. त्याच पार्श्‍वभूमीवर कमांडरला हटवले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डावीकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेंस्की आणि फैसल बिन फरहाद अल साऊदी

दुसरीकडे सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री फैसल बिन फरहाद अल साऊदी यांनी पहिल्यांदाच युक्रेनचा दौरा केला आहे. यात त्यांनी युक्रेनला आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे.