पॅलेस्टाईन नागरिकांनी इस्रायलच्या २ नागरिकांची हत्या केल्यानंतर वेस्ट बँकमध्ये हिंसाचार !

जेरूसलेम (इस्रायल) – पॅलेस्टाईनकडून इस्रालयच्या २ नागरिकांची हत्या करण्यात आल्यानंतर वेस्ट बँकमध्ये हिंसाचार होत आहे. शेकडो इस्रायली नागरिकांनी रस्त्यावर उतरून चारचाकी वाहने आणि घरे यांना आग लावली आहे. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर ४ जण घायाळ झाले आहेत. विशेष म्हणजे जॉर्डन देशात इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचे प्रतिनिधी एका शिखर संमेलनात भात घेत आहेत. याचा उद्देश या देशांतील तणाव अल्प करण्याचा आहे. त्याच वेळी ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी इस्रयलच्या सैन्याच्या आक्रमणात १२ पॅलेस्टाईन नागरिक ठार झाल्यानंतर पॅलेस्टाईनकडून इस्रायली नागरिकांची हत्या करण्यात आली होती.