देहली उच्च न्यायालयाने ‘अग्नीपथ’ योजनेच्या संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या !

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने केंद्रशासनाच्या ‘अग्नीपथ’ या सैन्यातील भरती संदर्भातील योजनेला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. ‘ही योजना आणण्याचा उद्देश देशाच्या सैन्याला अधिकाधिक सक्षम करणे हा आहे आणि ते देशाच्या हिताचे आहे’, असे मत न्यायालायने याचिका फेटाळतांना म्हटले आहे. या योजनेला आव्हान देणार्‍या याचिका देशाच्या विविध भागांत प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांची सुनावणी देहली उच्च न्यायालयाकडे वर्ग केली होती.