(म्हणे) ‘एक दिवस सर्व शिखांना मुसलमान बनवणार !’ – मौलाना महंमद सुलेमान

पाकिस्तानमधील मौलाना महंमद सुलेमान याची घोषणा !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मौलाना महंमद सुलेमान

नवी देहली – पाकमधील एका मौलानाने तेथील शिखांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर आता एक सुफी मौलाना डॉ. महंमद सुलेमान याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात तो सर्व ‘गलिच्छ’ शिखांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्यानंतर विश्रांती घेणार असल्याचे म्हणत आहे. हा व्हिडिओ ‘पाकिस्तान अनटोल्ड’ (पाकिस्तान अप्रकाशित) या ट्विटर खात्यावर शेअर करण्यात आला आहे.

मौलाना सुलेमान या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, आमचे पूर्ण नियोजन आहे. शिखांच्या गुरूंपेक्षा पैगंबर अधिक महान होते. शीख त्यांच्या गुरूंच्या मागे धावत आहेत आणि वाईट कामे करत आहेत.

संपादकीय भूमिका 

याविषयी खलिस्तानवादी गप्प का ? पाकच्या साहाय्याने भारतात खलिस्तानी कारवाया करणार्‍या खलिस्तानवाद्यांना धर्मांध मुसलमान अधिक जवळचे वाटतात का ?