पाकच्या दूतावासाच्या ट्विटर खात्यावरून उघूर मुसलमानांच्या समर्थनार्थ ट्वीट !

टीका झाल्यावर खाते ‘हॅक’ झाल्याचा पाकचा दावा !

( ‘हॅक’ करणे म्हणजे अज्ञातांकडून नियंत्रित करणे)

पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाच्या खात्यावरून करण्यात आलेले ट्विट

इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीनमधील चेंदगू येथे असणार्‍या पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाने १३ जानेवारीला ‘पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालय पाकिस्तानमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी चिनी साहाय्य आणि समर्थन मिळाल्याविषयी आभारी आहे.  आम्ही उघूर समाजाचे अधिकार आणि स्वातंत्र्य यांसह परस्परांच्या हिताच्या प्रकरणी चीनसमवेत काम करू. उघूरचे सूत्र चीनसाठी पूर्वीपासूनच संवेदनशील आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतामध्ये लाखो उघूर शिबिरामध्ये बंदीवान आहेत, हा दावा चीनने नेहमीचा फेटाळला आहे. चीनने याला प्रशिक्षण केंद्र असे सांगितले आहे’ असे ट्वीट केले होते. यावरून टीका होऊ लागल्यावर पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘आमचे ट्विटर खाते ‘हॅक’ (अज्ञातांकडून नियंत्रित करणे) झाले होते. १३ जानेवारीला करण्यात आलेले कोणतेही ट्वीट आमच्याकडून करण्यात आलेले नाही’, असा दावा केला.

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

संपादकीय भूमिका

चीन १० लाख उघूर मुसलमानांवर गेल्या काही वर्षांपासून अत्याचार करत असतांना एकही इस्लामी देश त्याविरोधात तोंड उघडत नाही आणि पाकने चीनच्या बाजूने याविषयी ट्वीट केल्यानंतरही त्याला याविषयी खोटे बोलावे लागत आहे, हे भारतातील पाकप्रेमी मुसलमान लक्षात घेतील का ?