गुजरातमधील समुद्रकिनार्‍यावरील ११० किमी भूमी खचली !

कर्णावती (गुजरात) – जोशीमठ गावात भूस्खलन होत असल्याचे समोर आल्यानंतर आता गुजरातच्या समुद्रकिनार्‍यावरील ११० किलोमीटरच्या किनार्‍यांवरही भूस्खलन होत आहे. यामुळेच कर्णावती शहर प्रतिदिन १२ ते १५ मिमी खचत आहे, असे तज्ञांनी सांगितले.

शास्त्रज्ञ रतीश रामकृष्णन् आणि अन्य शास्त्रज्ञ यांच्या मते गुजरात, दीव आणि दमण या भागांच्या ‘इस्रो’च्या वर्ष २०२१ च्या संशोधनामध्ये लक्षात आले की, गुजरातचा १ सहस्र ५२ किमी किनारा स्थिर आहे, तर ११० किमीचा किनारा खचल्याने नष्ट होत चालला आहे. यामागे वातावरणातील पालटल हे मुख्य कारण आहे. यामुळे ३१३ भूमी नष्ट झाल्या आहेत.