पुणे येथील जिल्हा उद्योग केंद्रातील निरीक्षकास लाच घेतांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – ‘पंतप्रधान रोजगार हमी योजने’अंतर्गत कर्ज संमत करण्यासाठी एका तरुणाकडून साडेतीन सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा उद्योग केंद्रातील निरीक्षक चंद्रभान गोहाड याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली. तरुणाने खिळे सिद्ध करण्याच्या व्यवसायाकरता कर्ज प्रकरण केले होते. त्याला संमती देण्याकरता गोहाड यांनी लाचेची मागणी केली होती. तेव्हा तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

संपादकीय भूमिका

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होईल, अशी शिक्षा त्यांना केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !