पंचशीलनगर, दडगे प्लॉट येथील प्रार्थनास्थळाचे चालू असलेले अवैध बांधकाम बंद करा !

सांगली येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सांगली, १४ जानेवारी (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात पंचशीलनगर, दगडे प्लॉट येथील परिसरात महापालिकेच्या रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रार्थनास्थळाचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. तरी हे अवैध बांधकाम तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे उपायुक्त श्री. राहुल रोकडे यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार श्री. नितीन शिंदे, भाजप नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, श्री. गौतम पवार, श्री. अविनाश मोहिते, श्री. सचिन पाटील, श्री. दगडू थोरात, श्री. प्रसाद रिसवडे यांसह अन्य उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

ठिकठिकाणी होणारी अवैध बांधकामे थांबवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना निवेदने द्यावी लागणे हे प्रशासनाला लज्जास्पद !