मॉरिशस येथील इस्कॉन संप्रदायाचे प.पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज यांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट !

प.पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज यांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट देतांना श्री. दत्तात्रय फोकमारे

यवतमाळ, १४ जानेवारी (वार्ता.) – इस्कॉन मंदिर, पिंपळगाव येथे मॉरिशस येथील प.पू. सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज यांचे ११ ते १३ जानेवारी या कालावधीत भक्तांसाठी सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे यांनी महाराजांना ‘सनातन पंचांग २०२३’ भेट दिले. समितीच्या कार्याविषयी त्यांना माहिती देण्यात आली. श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रचारार्थ महाराज विदर्भ दौर्‍यावर आले आहेत.