राजस्थानमध्ये पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांच्या ९ ठिकाणी एन्.आय.ए.कडून धाडी

एस्.डी.पी.आय.शी संबंधित मुबारक च्या घराबाहेर उपस्थित ‘एन्.आय.ए.’ चे पथक

कोटा (राजस्थान) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) राज्यातील बंदी असलेल्या ‘पॉप्युुलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) आणि तिचा राजकीय पक्ष ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) यांच्याशी संबंधित ९ लोकांच्या ठिकाणांवर धाड टाकली.

या प्रकरणी एस्.डी.पी.आय.शी संबंधित मुबारक याचा मुलगा नौशाद याला अटक करण्यात आली. तो एका केशकर्तनालयात काम करतो. मुबारक याचा शोध घेतला जात आहे. या धाडींत आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत.