थिरूवनंतपूरम् (केरळ)- राज्यातील साम्यवादी नेते एम्.बी. राजेश यांनी आदि शंकराचार्य यांच्यावर फुकाची टीका केली. ‘आदि शंकराचार्य यांच्यामुळे जातीव्यवस्था आणि वर्णाश्रमव्यवस्था अस्तित्वात आली. त्यांनी मनुस्मृतीवर आधारित जातीव्यवस्थेचा प्रसार केला’, अशी अभ्यासशून्य टीका त्यांनी केली आहे. (आदि शंकराचार्य यांच्या काळात हिंदूंचे धर्मग्रंथ, परंपरा यांच्यावर टीका करणार्यांची, त्यांचा विरोध करणार्यांची संख्या वाढली होती. त्या वेळी आदि शंकराचार्य यांनी भारतभर भ्रमण करून अशांशी वाद-विवाद करून त्यांना पराभूत केले ! त्यामुळे आदि शंकराचार्य यांचे कार्य साम्यवाद्यांच्या डोळ्यांत खुपते ! – संपादक) एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी राजेश यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आदि शंकराचार्य हे वेदांचे तत्त्वज्ञ होतेे. राजेश अशी वक्तव्ये करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. राजेश यांच्या या वक्तव्यावरून साम्यवाद्यांची भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञान यांच्याविषयी असलेली अनास्था दिसून येते. जरी ११ साम्यवाद्यांनी साम्यवादी तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य सांगणारे लिखाण केले, तरी ते आदि शंकराचार्य यांच्या तत्त्वज्ञानाच्या जवळ पोचू शकणार नाही.
संपादकीय भूमिका
|