भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये फेरी !

‘हिंदु धर्म जागरण समिती’चा स्तुत्य प्रयत्न !

‘हिंदु धर्म जागरण समिती’ने काढलेली फेरी

नागपूर – भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा, या मागणीसाठी येथे ‘हिंदु धर्म जागरण समिती’ने १ जानेवारी या दिवशी फेरी काढली. त्यात अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी उर्त्स्फूत घोषणा दिल्या, तसेच हनुमान चालिसाचे पठण केले.

एका कार्यकर्त्याने सांगितले, ‘‘भारत हा हिंदु धर्मियांचा देश आहे. या देशात १०० कोटी हिंदू रहातात. तरीही भारत हिंदु राष्ट्र नाही. जेथे मुसलमान किंवा ख्रिस्ती अधिक संख्येने असतात, तो देश इस्लामिक देश घोषित केला जातो. आपल्या देशात एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू रहात असूनही तो हिंदु राष्ट्र म्हणून घोषित का केला जात नाही ? भारताला हिंदु राष्ट्र घोषित करायलाच हवे.’’