संभाजीनगर येथे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभेचे फलक फाडले !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा

संभाजीनगर – २ जानेवारी या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी भाजपकडून शहरातील चौकाचौकांत फलक लावण्यात आले होते. तथापि उच्च न्यायालयासमोरील चौकात भाजपच्या कार्यकत्र्यांनी लावलेले फलक बंजारा ब्रिगेडकडून फाडण्यात आले. ‘संत सेवालाल महाराजांच्या नामकरण फलकाच्या समोर फलक लावण्यात आल्याने ते फाडण्यात आले आहेत’, असे कारण सांगितले जात आहे.