खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचार्‍यांचा ७२ घंटे संप !

सोलापूर – वीज मंडळाच्या खासगीकरणाच्या विरोधात ४ जानेवारीपासून ७२ घंट्यांचा संप वीज कामगार करणार आहेत, अशी माहिती ‘एम्.एस्.ई.बी. वर्कर्स फेडरेशन’चे विलास कोले यांनी २ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. अदानी इलेक्ट्रिक आस्थापनाने महाराष्ट्र राज्य वीज निर्माण आयोगाकडे समांतर परवान्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे खासगीकरणाच्या विरोधात वीज ग्राहक, लोकप्रतिनिधी आणि वीज कामगार संघटना सर्वत्र विरोध करत असून त्याविरोधात ‘कर्मचारी-अधिकारी संघर्ष समिती’ने आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४ जानेवारी या दिवशी ७२ घंट्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती विलास कोले यांनी सांगितली.

या खासगीकरणाचा फटका कर्मचार्‍यांसमवेत भविष्यात सर्व ग्राहकांना बसणार आहे. हा उठाव ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकत्रितपणे केल्यास सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल, असे सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही !
  • समस्या सोडवण्यासाठी संबंधितांना संपाचा पवित्रा घ्यावा लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?