अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा भाजप महिला मोर्चाच्या वतीने निषेध !

सांगली भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आलेले निषेध आंदोलन

सांगली – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नव्हते, असे म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सांगली भाजप महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर २ जानेवारीला निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, सौ. गीतांजली ढोपे-पाटील, सौ. उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, वैशाली पाटील, गंगा तिडके, माधुरी वसगडेकर यांसह अन्य महिला कार्यकत्र्या उपस्थित होत्या.