अमेरिकेवरील आक्रमणापूर्वीच ब्रिटन लादेन याला करणार होता ठार !

अमेरिकेने अचानक केलेल्या कारवाईमुळे ब्रिटनची योजना फसली !

लंडन (ब्रिटन) – अल्-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील आक्रमणाच्या पूर्वी ठार करण्याची सिद्धता ब्रिटनने केली होती. त्याला अमेरिकेनेही मान्यता दिली होती. ब्रिटन लादेन याला ठार करणार त्यापूर्वीच अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये लादेन याच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण चालू केले. त्यामुळे  लादेन सतर्क झाला आणि तो गुप्त स्थळी लपून बसला.

‘ब्रिटनच्या पूर्वी आम्ही लादेन याला ठार करणार’, या अमेरिकेच्या हव्यासामुळे लादेन बचावला. अमेरिकेच्या या कारवाईमुळे ब्रिटनला त्याची योजना पूर्ण करता आली नाही, असे आता समोर आले आहे. ‘द टाइम्स’ या दैनिकाने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.