अर्भकाला बेवारस सोडण्याची ५ वर्षांत ११ प्रकरणे, तर चालू वर्षी ४ प्रकरणे नोंद ! –  बाल हक्क संरक्षण आयोग, गोवा

असले प्रकार कायद्याने नाही, तर प्रत्येकाला नीतीमत्ता शिकवूनच रोखता येतात. कर्मफलन्याय, संचित, प्रारब्ध, ईश्वराचा न्याय आदी गोष्टी ठाऊक नसल्यानेच समाज स्वैर वागत आहे. समाजातील प्रत्येकालाच साधना शिकवणे आवश्यक बनले आहे !

सरकारी कर्मचार्‍यांनी त्रास दिल्यास व्हॉट्सॲपवर तक्रार करा ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कनिष्ठ पातळीवरील कर्मचार्‍याने जर त्यांचे काम चोख बजावले, तर ९९ टक्के प्रकरणे वरिष्ठांपर्यंत पोचणारच नाही, तसेच मंत्री किंवा आमदार यांच्यापर्यंत तक्रार करण्यास वाव रहाणार नाही.

साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व लक्षात घ्या !

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कार करण्याआधी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव येथील सनातनच्या आश्रमात ठेवण्यात आले होते. या वेळी त्यांचे पुत्र श्री. सुरेंद्र, श्री. राम, कन्या कु. दीपाली, तसेच अन्य नातेवाइक उपस्थित होते.

हिंदु धर्माच्या शिकवणुकीतून आपण खर्‍या धर्मनिरपेक्षतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आपल्याला अभिमन्यू बनून बलीदान द्यायचे नाही, तर अर्जुन बनायचे आहे. भक्तांचा कधी बळी जात नाही; म्हणून भक्त बनले पाहिजे. एका भक्तासाठीही देवाला प्रकट व्हावे लागते. आपल्याला लढायचे नाही, तर देवाने आपल्याला माध्यम बनवून कार्य केले पाहिजे.

शिवनेरी (पुणे) गडाच्या पायथ्याशी वाहनतळासाठी जागा द्यावी ! – श्री शिवाई मंदिर देवस्थान ट्रस्ट

शिवनेरी गडावर पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनतळाची समस्या गंभीर होत आहे. गडाच्या पायथ्याशी असणार्‍या दत्तनगर येथील पुनर्वसित गावठाणाची जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ‘श्री शिवाई मंदिर देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

इतर राज्यांत स्थलांतरित होणार्‍या उद्योगांविषयी श्वेतपत्रिका काढली पाहिजे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रनसह अन्य प्रकल्पांविषयी नेमके काय झाले, ही वस्तूस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३१ ऑक्टोबर येथे पत्रकारांशी बोलतांना केली.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा वेतनकपातीचा आदेश झुगारला !

जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील ‘बायोमेट्रिक’ यंत्र बंद असल्याने कर्मचारी कोणत्याही वेळेत ये-जा करतात. यंत्र चालू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत.

गंगेची वाडी (पेण) येथे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांना हिंदुत्वनिष्ठांनी रोखले !

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर गुन्हे नोंद होणारे कडक कायदे हवेत !

महाविकास आघाडीच्या काळातच ‘फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी विरोधी पक्षनेता असतांना टाटा एअरबस प्रकल्पाच्या प्रमुखांना प्रकल्पासाठी मी नागपूर येथील भूमी दाखवली.