यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा वेतनकपातीचा आदेश झुगारला !

जिल्हा परिषद, यवतमाळ

यवतमाळ, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील कार्यालयीन वेळेत अनुपस्थित रहाणार्‍या ३३ कर्मचार्‍यांचा १ दिवसाचा वेतनकपातीचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी काढला होता; मात्र बांधकाम विभाग क्र. १ ने हा आदेश झुगारून देत १२ अनुपस्थित कर्मचार्‍यांचे पूर्ण वेतन काढले.

जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील ‘बायोमेट्रिक’ यंत्र बंद असल्याने कर्मचारी कोणत्याही वेळेत ये-जा करतात. (जिल्हा परिषदेचा गलथान आणि मनमानी कारभार ! – संपादक) यंत्र चालू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. (असे आदेश का द्यावे लागतात ? – संपादक)