उत्तरप्रदेशमध्ये ९ जणांची इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’

मुझफ्फरनगर येथे ९ जणांनी इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’ केली. हिंदु धर्म स्वीकारणारे हे कुटुंब मूळचे सहारनपूरचे आहे. त्यांच्या पूर्वजांनी दीडशे वर्षांपूर्वी दबावाखाली इस्लाम पंथ स्वीकारला होता. आता ते स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले आहेत.

ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मिळण्याच्या याचिकेवर १४ नोव्हेंबरला येणार निकाल !

येथील जलद गती न्यायालयाकडून याविषयी निर्णय देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात कारवाई करा !

शेती करण्याच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील (मुख्यत्वे केरळातील) व्यावसायिक अमली पदार्थांची शेती करत आहेत. यामुळे जिल्ह्याला अमली पदार्थांचा विळखा वाढला आहे, असे पोलीस आधिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

गोवा : अमली पदार्थ व्यावसायिक एडविन न्युनीस याचे देशभरात ५० सहस्र ग्राहक

एडविनच्या विरोधात गोवा पोलिसांनी कारवाई का केली नाही ? त्यामुळे ‘अमली पदार्थ व्यावसायिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या साटेलोटे असल्याने न्युनीस यांच्यासारख्या गुन्हेगारावर कारवाई होत नाही’, असे सर्वसामान्यांना वाटल्यास चुकीचे ठरणार नाही !

हिंदुद्वेष्टा कलाकार वीर दास याचा बेंगळुरूतील कार्यक्रम रहित करा !

बेंगळुरूसारख्या सामुदायिकदृष्ट्या संवेदनशील शहरामध्ये अशा कार्यक्रमाला अनुमती देणे योग्य नाही. अशा कार्यक्रमांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे वीर दास याचा कार्यक्रम रहित करण्यात यावा, अशी आम्ही मागणी करतो.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

‘भ्रष्टाचार, बलात्कार, बुद्धीप्रामाण्यवाद, अनैतिकता, गुंडगिरी, देशद्रोह, धर्मद्रोह इत्यादींना आता जे उधाण आले आहे, त्याला कारणीभूत आहेत, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे जनतेला साधना, नैतिकता इत्यादी न शिकवणारी आतापर्यंतची सरकारे ! यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले