ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मिळण्याच्या याचिकेवर १४ नोव्हेंबरला येणार निकाल !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मिळण्याविषयीच्या याचिकेवर ८ नोव्हेंबरला येणार निकाल आता १४ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. येथील जलद गती न्यायालयाकडून याविषयी निर्णय देण्यात येणार आहे.

ज्ञानवापीमधील वजुखानाच्या आत सापडलेली संरचना ही ‘शिवलिंग’ आहे. त्यामुळे तिची पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी, संपूर्ण ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या नियंत्रणात द्यावा, तसेच संकुलात मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घालावी, अशा मागण्याही या याचिकेत हिंदूंकडून करण्यात आल्या आहेत. येथे सध्या मुसलमानांकडून नमाजपठण करण्यात येते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये जिल्हा न्यायालयाने शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी करण्याची अनुमती नाकारली होती.