सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह भाषा वापरणारे जगदीश गायकवाड कर्जत पोलिसांच्या कह्यात

पनवेल – वरिष्ठ दलित नेत्यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी पनवेल येथील जगदीश गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली होती. जामीन मिळून परत जातांना अन्य एका प्रकरणी कर्जत पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी गाडीत बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तसेच त्या वेळी पोलिसांनी घेरल्यावर त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कर्जत पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले.