पंढरपूर विकास आराखड्याला विरोध करू नये ! – बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ कीर्तनकार

संतवीर बंडातात्या कराडकर

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – वाराणसी आणि उज्जैन यांच्या धर्तीवर पंढरपूर अन् विठ्ठल मंदिर परिसर यांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने विकास आराखडा सिद्ध केला आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे लाखो भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील व्यापारी आणि रहिवासी यांनी विकास आराखड्याला विरोध करू नये, असे आवाहन ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या विकास आराखड्याचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, विकास आराखड्यामध्ये बाधित होणारे स्थानिक व्यापारी आणि रहिवासी यांना राज्य सरकारने भरीव आर्थिक साहाय्य देऊन त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे; परंतु विकासकामाला व्यापार्‍यांनी विरोध करू नये.