नागपूर – नागपूर ते पुणे हा प्रवास आता केवळ ८ घंट्यांत शक्य होणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाला ‘एक्सेस ग्रीन एक्सप्रेस-वे’ने जोडण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.
नागपूर-पुणे ८ तासांत!#PragatiKaHighway pic.twitter.com/W0guak1n4f
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 30, 2022
ते पुढे म्हणाले, ‘‘सद्यस्थितीत नागपूर ते पुणे या प्रवासात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे-औरंगाबाद एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे ने जोडण्यात येईल. यामुळे पुणे-संभाजीनगर प्रवास अडीच घंट्यांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर-संभाजीनगर प्रवास साडेपाच घंट्यांत होईल.’’