दीपावलीच्या निमित्ताने राजेश क्षीरसागर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ भेट !

श्री. राजेश क्षीरसागर यांना ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, तसेच हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – दीपावलीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून ‘माझाही यथाशक्ती समितीच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभाग देण्याचा प्रयत्न असतो’, असे सांगितले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) श्री. किशोर घाटगे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अजय केळकर उपस्थित होते.