भाजप आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आरोप

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भाग्यनगर (तेलंगाणा) – भारत राष्ट्र समितीच्या २० ते ३० आमदारांच्या खरेदीचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एका सभेमध्ये केला. या सभेमध्ये भारत राष्ट्र समितीचे ते ४ आमदारही उपस्थित होते, ज्यांना कथितरित्या खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपयांचे आमीष दाखवण्यात आले होते. नुकतेच त्यांना १५ कोटी रुपये देण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली होती.

चंद्रशेखर राव म्हणाले की, देहलीच्या दलालांनी आमदारांची खरेदी करत सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. तेलंगाणाच्या एका फार्महाऊसमध्ये आमच्या ४ आमदारांना १०० कोटी रुपयांचे आमीष दाखवले गेले; पण माझे आमदार विकले जाणार नाहीत. त्यांनी या षड्यंत्राविषयी पोलिसांना कळवले.