मराठीतून निवेदन करण्यासाठी ‘स्टार स्पोर्ट्स’ला मनसेकडून चेतावणी !

महाराष्ट्रात प्रक्षेपण करून कोट्यवधी रुपये कमवायचे; मात्र मराठीला प्राधान्य देण्यासाठी चालढकल करायची, असा उद्दामपणा करणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे !

महिला तस्करीविषयी राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोग संयुक्त कार्यक्रम राबवणार ! – रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

संभाजीनगर येथून ३९ दिवसांत ५८ महिला गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या पुणे येथे बोलत होत्या.

सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचे काम बंद पडू दिले जाणार नाही ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री, सातारा

जलसंपदाच्या करारतत्त्वावरील जागेत रहाणारे गाळेधारक आणि कुटुंबीय यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. त्यानंतरही कुणी काम बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

वर्ष १९२५ मध्ये ब्रिटीश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी ‘वक्फ कायदा’ अस्तित्वात आणला होता.

पंढरपूर येथे विकासाचा सुधारित आराखडा सिद्ध करण्यासाठी ड्रोन छायाचित्रकाद्वारे चित्रीकरण !

श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नव्याने समाविष्ट करण्याच्या कामांचा सुधारित सर्वंकष आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.

श्रीरामपूर (नगर) येथील लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटर टोळीवर मकोका कारवाई !

येथे घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटर याच्यासह ६ जणांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.

स्टॅलिन यांचा हिंदीद्वेष !

केंद्र सरकारने हिंदीविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि हिंदीला विरोध असणार्‍या राज्यांमध्ये जनमत घ्यावे, तेथील स्थानिकांना व्यक्त होऊ द्यावे. हिंदीची मागणी असणार्‍यांना हिंदी भाषा शिक्षण उपलब्ध करावे. एकूणच काय हिंदी राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावण्यासाठी सर्वांचीच मानसिकता पालटणे आवश्यक आहे.

भिवंडी तालुक्यात वीज कोसळून २ ठार, तर २ जण घायाळ !

भिवंडी तालुक्यातील पिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चिराडपाडा या आदिवासी वस्तीत १४ ऑक्टोबर या दिवशी पडलेल्या पावसाच्या वेळी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत शीतल वाघे (वय १७ वर्षे) आणि योगिता वाघे (वय २० वर्षे) या दोघींचा मृत्यू झाला आहे.

केंद्र सरकारने अशा फटाक्यांवर बंदी घालावी !

तमिळनाडूमधील ‘रथनास्’ या फटाक्यांची निर्मिती करणार्‍या आस्थापनाच्या संकेतस्थळावर हिंदूंच्या आराध्यदेवता श्री गणेश, श्रीराम, सीतामाता आणि श्री महालक्ष्मीदेवी यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री चालू आहे.

‘धर्मांधांवर कारवाई करावी लागू नये, यासाठी हिंदूंनी नमाजपठणाची अनुमती दिली’, असे खोटे सांगणार्‍या पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक !

हिंदु महिलांनी अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाच्या निषेधार्थ हातात फलक पकडून निदर्शने केली. याच वेळी पोलिसांच्या कडक सुरक्षेत नमाजपठणही करण्यात आले.