ठाणे – भिवंडी तालुक्यातील पिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चिराडपाडा या आदिवासी वस्तीत १४ ऑक्टोबर या दिवशी पडलेल्या पावसाच्या वेळी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत शीतल वाघे (वय १७ वर्षे) आणि योगिता वाघे (वय २० वर्षे) या दोघींचा मृत्यू झाला आहे. सुगंधा वाघे (वय ४० वर्षे) आणि रोशन ठाकरे (वय २० वर्षे) हे दोघे गंभीररीत्या घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.