मराठीतून निवेदन करण्यासाठी ‘स्टार स्पोर्ट्स’ला मनसेकडून चेतावणी !

मुंबई – ‘स्टार स्पोर्ट्स चॅनेल’वर मराठीतून खेळांचे निवेदन करण्यात यावे, यासाठी मनसेकडून चेतावणी देण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरपासून ‘टी २०’ विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे; परंतु यंदाही ‘स्टार स्पोर्ट्स’वर मराठीतून खेळांचे निवेदन होणार नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या दूरसंचार सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार स्पोर्ट्स’च्या परळ येथील कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्टार स्पोर्ट्स’वर ज्याप्रकारे इतर भाषांमध्ये प्रक्षेपण केले जाते, त्याप्रकारे मराठीतूनही करण्यात यावे’, या मागणीसाठी मनसेने आंदोलनाची चेतावणी दिली आहे. त्यानंतर ‘स्टार स्पोर्ट्स चॅनेल’च्या अधिकार्‍यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

संपादकीय भूमिका 

महाराष्ट्रात प्रक्षेपण करून कोट्यवधी रुपये कमवायचे; मात्र मराठीला प्राधान्य देण्यासाठी चालढकल करायची, असा उद्दामपणा करणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे !