सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचे काम बंद पडू दिले जाणार नाही ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री, सातारा

सातारा, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – जलसंपदाच्या करारतत्त्वावरील जागेत रहाणारे गाळेधारक आणि कुटुंबीय यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. त्यानंतरही कुणी काम बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अनावश्यक अपसमज पसरवून कुणीही आंदोलने करू नयेत. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मी सिद्ध आहे. त्यांनी चर्चेसाठी यावे, आवाहनही मंत्री देसाई यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गत १०० दिवसांत जनहितासाठी काढलेल्या ७०० अध्यादेशांची माहिती देण्यासाठी पालकमंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.