कारंजा (लाड) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या विरोधात नायब तहसीलदारांना निवेदन !

खासगी आस्थापनांना दिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती त्वरित रहित करावी, तसेच संबंधित संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून त्यांना मिळालेल्या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ?, राष्ट्रीय सुरक्षेला यात काही धोका नाही ना ?

स्त्रीने स्वत:तील सकारात्मकता वाढवली, तर तिच्या घरातील सदस्यांसह पर्यायाने समाज संस्कारशील बनू शकतो ! – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

ऋषिकेशमधील ‘परमार्थ निकेतन’ येथे ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी ‘नारी संसद’ पार पडली. त्यामध्ये सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी ‘आध्यात्मिक विकास आणि नेतृत्व करण्यामध्ये महिलांची भूमिका’ या विषयावर त्या बोलत होत्या. या विषयाच्या वेळी ३५० लोकांची उपस्थिती होती.

इंदापूर-बारामती रस्त्यावर ५५ लाख रुपयांचा गांजा शासनाधीन !

इंदापूर-बारामती रस्त्यावर सोलापूरहून बारामतीकडे विक्रीसाठी नेत असलेला २१८ किलो २०० ग्रॅम वजनाचा ५४ लाख ५५ सहस्र रुपयांचा गांजा, तसेच ३ चारचाकी गाड्या असा एकूण ८० लाख ५५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला.

१५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार

महापालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

मुंबई येथे जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांना उलट्या झाल्याने त्यांचे वाटप थांबवले !

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेविकांनी घरोघरी दिलेल्या जंतनाशक गोळ्या घेतल्याने लहान मुलांना उलट्या होत आहेत. या गोळ्या निकृष्ट दर्जाच्या किंवा जुन्या असल्याची भीती व्यक्त करत आरोग्यसेविकांनी गोळ्यांचे वाटप बंद केले आहे.

प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे देहूतील (जिल्हा पुणे) सांडपाणी प्रकल्पाचे काम अनेक मासांपासून बंद !

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात देहूसाठी ३१ कोटी रुपयांचा सांडपाणी आणि मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला; मात्र हा प्रकल्प गेले अनेक मास बंद आहे. त्यामुळे ३ गावांतील सांडपाणी सरळ इंद्रायणीच्या पाण्यात मिसळत आहे.

नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांचे पुनर्वसन करतांना मूळ भूमीइतकीच भूमी देण्याचे शासन धोरण घोषित !

शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून १४ ऑक्टोबर या दिवशी याविषयीचा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश इथे पाहू शकता . . .

वढू आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची स्वराज्य संघाची मागणी !

श्रीक्षेत्र वढू आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी स्वराज्य संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

६५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात युवती, तरुणी आणि वृद्ध महिलाही असुरक्षित असणे लज्जास्पद !

दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचार्‍यांना १२ सहस्र ५०० रुपये अग्रीम !

अराजपत्रित शासकीय कर्मचार्‍यांना उत्सव अग्रीम (आगाऊ रक्कम) म्हणून बिनव्याजी १२ सहस्र ५०० रुपये देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांप्रमाणेच गट ‘क’ आणि गट ‘ब’ या अराजपत्रित संवर्गातील कर्मचार्‍यांनाही उत्सव अग्रीम मिळणार आहे.