‘हलाल सक्ती’ला विरोध करण्यासाठी हलालविरोधी कृती समितीची स्थापना ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

जिल्ह्याजिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन होत आहे. या उपक्रमात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने या वेळी करण्यात आले.

दिग्रस येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध !

धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन.

नागपूर येथे महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञास लाच घेतांना अटक !

याविषयी त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता पावडे यांनी नवीन वीजमीटर लावून घेण्यास सांगितले आणि त्यासाठी कागदपत्रे अन् ७ सहस्र ५०० रुपयांची लाच मागितली होती.

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी अमरावती येथे परिवहन अधिकार्‍यांना निवेदन !

सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते.

खोटी देयके सिद्ध करून महावितरणची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

‘मराठवाडा रेल कोच फॅक्टरी’साठी नवीन ३३ केव्ही लाईनच्या कामासाठी साहित्य खरेदी करण्यात आले होते. याची बनावट देयके सिद्ध करून महावितरणला देण्यात आली होती. ही देयके नंतर सरकारकडे संमतीसाठी पाठवण्यात आली होती.

मनाच्या आजारावर साधनेची मात्रा !

भारताला असणारी आध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेता, मनोविकार जडलेल्यांसाठी वैद्यकीय औषधोपचारांसह साधनेचीही मात्रा आवश्यक अन् क्रमप्राप्त आहे. असे केल्यास मने सुमने होतील आणि ती आनंदाने डोलून त्यांचा सुगंध सदासर्वकाळ दरवळत राहील !

ठाणे जिल्ह्यात अवैधरित्या वाळूउपसा करणार्‍यांवर कारवाई !

ठाणे जिल्ह्यातील खाडी आणि नदी येथे रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैधरित्या उत्खनन करण्यात येते. त्याविषयी केलेल्या तक्रारींची नोंद घेत जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या साहाय्याने ही धडक कारवाई ११ ऑक्टोबर या दिवशी केली.

कल्याण शिळफाटा रस्त्यावर जलवाहिनी फुटून शेकडो लिटर पाणी वाया !

नागरिकांनी सूचना देऊनही तत्परतेने उपाययोजना न करण्यात एम्.आय.डी.सी. कर्मचार्‍यांची चौकशी केली पाहिजे ! पाणी तर वाया गेलेच शिवाय सामान्य नागरिकांचीही त्यामुळे गैरसोय झाली असणार. ही हानी कोण भरून काढणार ?

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेसह १४ जणांविरुद्ध ‘मकोका’ !

कुख्यात गुंडाची गुंडगिरी अजूनही चालू रहाते, यावरून पोलिसांचा धाक त्यांना नाही, हेच सिद्ध होते. पोलीस त्यांचा धाक केव्हा निर्माण करणार ?

महिलेशी गैरवर्तन करणार्‍या मुसलमानाला मुंब्रा पोलिसांकडून अटक !

सामाजिक माध्यमांवर कार्यरत असलेल्या एका महिलेने मागील ५ मासांपासून रफिक कामदार हा सहकारी तिच्यासमवेत चुकीचे वर्तन करत असल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून कामदार याला पोलिसांनी अटक केली आहे.