भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

पू. अण्णांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधकांनी त्याविषयी व्यक्त केलेले मनोगत आपण १२.१०.२०२२ या दिवशी पाहिले. आज अंतिम भागात धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे पहाणार आहोत.

गुरुसेवेची तीव्र तळमळ, सतत देवाप्रती कृतज्ञता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले  यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेले ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते !

आश्विन पौर्णिमा, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा (९.१०.२०२२) या दिवशी श्री. बाळासाहेब विभूते यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा मोठा मुलगा श्री. अभिजित विभूते यांना त्यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा (वय ८० वर्षे) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन

‘मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा यांचा आश्विन कृष्ण चतुर्थी (१३.१०.२०२२) या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधिका कुठेही असली, तरी ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून सतत समवेत आहेत’, असे तिला जाणवणे आणि तिचे मन ‘गुरुदेव अन् स्वतःची साधना’, यांवरच केंद्रित असणे

‘मी कुठेही गेले असेल, तरीही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवते. केवळ ‘माझे गुरुदेव, मी आणि माझी साधना’, यांवरच माझे लक्ष केंद्रित असते. ‘माझे लक्ष दुसरीकडे जात नाही’, ही केवळ गुरुदेवांची कृपा आहे.

निर्मळ आणि इतरांचा विचार करणारी ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कु. वैदेही मनोज खाडये (वय १६ वर्षे) !

‘आश्विन कृष्ण चतुर्थी (१३.१०.२०२२) या दिवशी कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील कु. वैदेही मनोज खाडये हिचा १६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.