नागपूर, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – नवीन वीजमीटर लावून देण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून ७ सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारतांना वानाडोंगरी हिंगणा येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ विशाल पावडे (वय ४० वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. ही कारवाई ११ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. तक्रारदारांच्या घरी वीज वापरतांना अधिक प्रमाणात वीजदेयक येत होते. याविषयी त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन विचारपूस केली असता पावडे यांनी नवीन वीजमीटर लावून घेण्यास सांगितले आणि त्यासाठी कागदपत्रे अन् ७ सहस्र ५०० रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार केली.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेले महावितरण कार्यालय ! |