डोंबिवली (जिल्हा ठाणे) – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील दावडी जवळील व्यंकटेश पेट्रोलपंपाजवळ ११ ऑक्टोबरच्या रात्रीपासून एम्.आय.डी.सी.ची एक जलवाहिनी फुटून मोठे कारंजे उडू लागले आणि शेकडो लिटर पाणी वाया गेले. परिसरातील नागरिकांनी एम्.आय.डी.सी. कार्यालयात रात्रीच कळवले; परंतु तेथून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जलवाहिनीची दुरुस्ती होऊ न शकल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले. (नागरिकांनी सूचना देऊनही तत्परतेने उपाययोजना न करण्यात एम्.आय.डी.सी. कर्मचार्यांची चौकशी केली पाहिजे ! पाणी तर वाया गेलेच शिवाय सामान्य नागरिकांचीही त्यामुळे गैरसोय झाली असणार. ही हानी कोण भरून काढणार ? – संपादक)