गुरुग्राम (हरियाणा) येथे जमावाकडून मशिदीवर आक्रमण

या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी १२ लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. आक्रमणकर्त्यांचा हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे काढलेल्या दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे दसर्‍याच्या दिवशी काढलेल्या श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

गोव्यात डिसेंबरमध्ये जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद

जगाचे आयुर्वेदाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ९ वी जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद आणि प्रदर्शन कला अकादमी, पणजी, गोवा येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

बालवयातील मुलांसारखे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्‍वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेस प्रारंभ !

महाराष्ट्र, कर्नाटक यांसह लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेस ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्वस्त्रामध्ये सोने लपवल्याप्रकरणी दोघांना अटक

एअर इंटेलिजन्स युनिटने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली. आरोपींमध्ये नईमा अहमद उल्दय (वय ६२ वर्षे) आणि रज्जद नोरे याला अटक करण्यात आली आहे.

ईश्‍वराची भक्ती केली, तर तो संकटकाळात आपले निश्‍चितच रक्षण करील, याची निश्‍चिती बाळगा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, देवगड, कुडाळ आणि कणकवली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत …

मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलात नक्षलवाद्यांचे साहित्य मिळाले !

कुरखेडा भागातील मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके आणि अन्य साहित्य असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर विशेष अभियान पथक गडचिरोली आणि बी.डी.डी.एस्. पथकाचे जवान यांनी कारवाई करून ते शोधून काढले आहे.

ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही !

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तिथे पोटनिवडणुका होणार आहेत. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असून त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल केल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हे नोंद !

शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागप्रमुख दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.