पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी केलेली भावपूर्ण प्रार्थना !

पू. माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, प.पू. दास महाराज यांच्या पत्नी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी दिवसातून ६ वेळा भावपूर्ण प्रार्थना करतात.

बसुर्ते, बेळगाव येथील सौ. रूपाली निवृत्ती कुंभार यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती

‘बसुर्ते, बेळगाव येथील सौ. रूपाली निवृत्ती कुंभार यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना आणि हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार करतांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

आश्रम पहातांना मला अतिशय दिव्य आणि जगावेगळीच अनुभूती आली.’ – श्री. ए.व्ही. बागुर, बेंगळुरू, कर्नाटक

नागपूर येथे मोक्का लावलेल्या बंदीवानाकडे गांजा आणि भ्रमणभाषच्या १५ बॅटर्‍या सापडल्या !

यामध्ये निश्‍चित बंदोबस्तातील पोलीस अथवा बंदीवानाला भेटायला येणारे त्याचे नातेवाईक यांचा सहभाग असू शकतो. कारागृहातील बंदीवानांकडे लक्ष ठेवू न शकणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !

श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर (जिल्हा अमरावती) यांच्या वतीने भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा !  

श्री रुक्मिणी विदर्भ पीठचे पिठाधिश्‍वर जगदगुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्यजी, समर्थ माऊली सरकार यांनी अमरावती येथे गणेशोत्सवानिमित्त चिंतामणी गणेश मंदिराची स्थापना, गणेश महायाग, तसेच भव्य संत संमेलन आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले होते.

आयकर विभागाकडून १०० ठिकाणी एकाच वेळी धाडी !

उत्तराखंड, उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये या धाडी घालण्यात आल्या. राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ५३ हून अधिक ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.

भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून नियुक्त

४२ वर्षीय सुएला यांनी यापूर्वी ब्रिटन सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. याआधी त्या बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अ‍ॅटर्नी जनरल म्हणून कार्यरत होत्या.

कोल्हापूर महापालिकेच्या कृतीमुळे हिंदूंच्या देवतेचा अवमान ! – नितेश राणे, आमदार, भाजप

कोल्हापूर महापालिकेने भाविकांकडून विविध कुंडांमध्ये गोळा केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित करतांना त्या फेकल्याचा ‘व्हिडिओ’ समोर आला आहे. या संदर्भात अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.