‘बसुर्ते, बेळगाव येथील सौ. रूपाली निवृत्ती कुंभार यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना आणि हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार करतांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे पाहिल्यावर साधिकेला ‘ते तिच्याकडे बघून हसत आहेत’, असे जाणवणे : ‘२६.५.२०२२ या दिवशी मी सकाळी ९ ते १० या वेळेत ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे पाहिल्यावर ‘ते माझ्याकडे बघून हसत आहेत’, असे मला जाणवले.
१ आ. नामजप करतांना उजव्या हाताच्या अंगठ्याचे नख आणि दोन्ही हात पिवळे दिसणे : २९.५.२०२२ या दिवशी मी सकाळी ९ ते १० या वेळेत ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. मी घड्याळ बघण्यासाठी डोळे उघडल्यावर मला माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्याचे नख आणि दोन्ही हात पिवळे दिसत होते. त्या वेळी माझा नामजप भावपूर्ण झाला. मला ‘ध्यानमंदिरातून बाहेर जावे’, असे वाटत नव्हते. ‘मी आसंदीला घट्ट चिकटून बसले आहे’, असे मला जाणवले.
२. हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार करतांना मोगर्याच्या फुलांचा सुगंध येणे
२८.५.२०२२ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार करतांना मला मोगर्याच्या फुलांचा सुगंध (दैवी सुगंध) आला.’
– सौ. रूपाली निवृत्ती कुंभार, बसुर्ते, बेळगाव. (५.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |