हिंदूंच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक : ६ पोलिसांसह अनेक जण घायाळ

सीवान (बिहार) – येथील महावीरी आखाड्याच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांकडून मशिदीवरून दगडफेक करण्यात आली. यात ६ हून अधिक पोलीस घायाळ झाले, तर दोन्ही बाजूंकडून काही जण घायाळ झाले. दगडफेकीनंतर पळून जाणार्‍या पोलिसांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. हिंसाचाराची ही घटना ८ सप्टेंबरला घडली. या घटनेचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

पाटलीपुत्र येथे मशिदीजवळ धर्मांधांंकडून पोलिसांवर आक्रमण करून आरोपींना सोडवून पळून जाण्यास दिले !

येथील पीर बहोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या शिया मशिदीजवळ काही जण हत्यारांसह असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस त्यांना पकडण्यासाठी घटनास्थळी गेले होते. पोलिसांनी आरोपींना पकडलेही होते; मात्र शेजारी रहाणार्‍या धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. त्यांनी पोलिसांच्या कह्यातून आरोपींची सुटका करून त्यांना पळून जाण्यास दिले. या वेळी एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला. त्यानंतर धर्मांधांचा जमाव पोलीस ठाण्यात गेला आणि तेथे गोंधळ घातला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदीवरून दगडफेक होते, हे ठाऊक असतांनाही पोलीस याची काळजी आधीच का घेत नाहीत ? मशिदीवरून होणार्‍या अशा आक्रमणांविषयी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, एम्आयएम् आदी ढोंगी निधर्मीवादी पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदीवरून होणारी दगडफेक कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !