नाशिक – मिरवणूक मार्गावरील मशिदीत अजान चालू झाल्याने शिवसेवा मित्र मंडळाने मिरवणुकीतील वाद्य वाजवणे थांबवले. यामुळे तथाकथित निधर्मीवाद्यांना मंडळाचे कौतुक वाटले. येथील मुख्य मिरवणुकीत २४ मंडळाचा सहभाग होता. हनुमानाच्या वेशातही काही जण सहभागी झाले होते.
संपादकीय भूमिकाहिंदु सहिष्णु असल्याने अन्य धर्मियांच्या धार्मिक कृतीच्या वेळी त्यांचा सन्मान करतात; मात्र कधी मंदिरात आरती चालू झाल्यावर ती संपेपर्यंत मशिदीतून अजान देण्याचे कधी थांबवले जाते का ? हिंदूंची धार्मिक मिरवणूक चालू असतांना अजान का थांबवली जात नाही ? उलट मशिदींमधून मिरवणुकांवर आक्रमण करण्याच्याच घटना घडल्याचे दिसून येत असतात ! |