महाराष्ट्रात अतीवृष्टीचा २९ जिल्हे आणि ३६८ गावे यांना फटका !

 एन्.डी.आर्.एफ् आणि ‘एस्.डी.आर्.एफ्.’च्या ७ तुकड्या तैनात !

मुंबई – राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतीवृष्टीचा २९ जिल्हे आणि ३६८ गावे यांना फटका बसला असून नागरिकांसाठी ११७ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. २० सहस्र ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. अतीवृष्टीमुळे ३०७ नागरिकांनी जीव गमावला आहे, तर ५ सहस्र ७८९ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांची पूर्णत: तर ३ सहस्र ५४० घरांची अंशत: हानी झाली आहे.

‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला’ची (एन्.डी.आर्.एफ्.ची) मुंबई येथे २, रायगड १, ठाणे १, सांगली १, अशी एकूण ५ पथके तैनात करण्यात आली आहेत; तसेच नांदेड  आणि गडचिरोली अशा एकूण २ ठिकाणी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद दला’च्या (एस्.डी.आर्.एफ्.च्या) तुकड्या तैनात केल्या आहेत.