बरेली (उत्तरप्रदेश) मशीद बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या महंमद समद याला अटक

आरोपी महंमद समद

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील जामा मशीद शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बाँबने उडवण्याची आणि मशिदीच्या इमामाला (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणार्‍याला) गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद समद नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. याने ७ सप्टेंबर या दिवशी मशिदीच्या भिंतीवर वरील धमकीचे भित्तीपत्रक चिटकवले होते.

पोलिसांनी सांगितले की, मशिदीचा इमाम मुफ्ती खुर्शीद आलम याने ईद मिलाद उन-नबी या सणाच्या वेळी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीच्या वेळी डीजे (मोठी संगीत यंत्रणा) वापरू नये, असे आवाहन केले होते. त्यावरून समद याला राग आला होता. इमाम आलम याला मशिदीतून काढण्यासाठी त्याने धमकी देण्याचा कट रचला.

संपादकीय भूमिका

हिंदू कधी अशी धमकी देणार नाहीत आणि असे कृत्य करणार नाहीत, हे सत्य आतातरी हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ ठरवणारे लक्षात घेतील का ?