‘वन्दे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘वन्दे मातरम्’ला वर्ष १९०९ मध्ये मुस्लिम लीगने प्रथम विरोध केला आणि वर्ष १९४७ मध्ये ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणारे भारताची फाळणी करून दुसर्‍या देशात म्हणजे पाकिस्तानात गेले. ‘वन्दे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे.

पाकमध्ये पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित

पाकच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३४३ लहान मुलांचा समावेश आहे. तसेच ३० लाख लोक बेघर झाले आहेत.

हिंदूंना ठार मारण्याची धमकी देणार्‍या वाजिद सईदच्या विरोधात सनातन संस्थेच्या वतीने पोलिसांत तक्रार

एका ई-मेलद्वारे साधकांना ठार मारण्याची धमकी देणार्‍या आणि जाणूनबुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वाजिद सईद याच्या विरोधात सनातन संस्थेने फोंडा पोलीस ठाणे आणि रायबंदर येथील सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली आहे.

संप्रदायवाद सोडून हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद जोपासा ! – पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, जिल्हाप्रमुख, गुरुवंदना मंच, वलसाड, गुजरात

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे स्वतःसह सर्वांचे दायित्व आहे. सरकार हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास सिद्ध आहे. आपण मागणी करत नाही, हीच आपली चूक आहे. ज्या प्रकारे शेतकर्‍यांनी अनेक मास आंदोलने केल्याने सरकारला ३ कृषी कायदे रहित करावे लागले, त्या प्रकारेच हिंदूंना सरकारवर हिंदु राष्ट्र…

हार-फूल यांवरील निर्बंधांविषयी धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात असलेली हार-फूल यांवरील बंदी कायम असून याविषयी सर्वंकष धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ३० दिवसांत या समितीला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

पिंपरी (पुणे) येथील ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यामध्ये ‘महावितरण’चा गलथान कारभार !

नवीन वीजजोडणी देण्यामध्ये ‘महावितरण’चा गलथान कारभार असेल, तर ग्राहकाला दैनंदिन सेवा देण्यात किती असेल ?

शिवसेना – संभाजी ब्रिगेड युती म्हणजे ‘विनाशकाले विपरीतबुद्धी !’ – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

भाजपने यावर जोरदार टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आता कुणीही युती करायला सिद्ध नाही, त्यांची अवस्था अशी झाली आहे की, आता ते सैराट मित्रमंडळाशीही युती करतील.’

भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिकाला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

भूमापन कार्यालयातील एका कामाचे नोंद प्रकरण घेऊन ते संमत करून देण्यासाठी भूमापन कार्यालयातील प्रमुख लिपिक बांदल यांनी तक्रारदाराकडे ५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

गणेशोत्सवानिमित्त गावाला जाणार्‍या भाविकांना भरमसाठ दराने तिकीटविक्री होत असूनही राज्य परिवहन विभागाचे दुर्लक्ष !

उत्सवाच्या काळात खासगी बसगाड्यांनी प्रवाशांकडून भरमसाठ तिकीट आकारणे, ही जनतेची लूट आहे. अशा प्रकारची लूट वर्षांनुवर्षे चालू असतांना प्रशासन झोपले आहे का कि ही लूट त्याला मान्य आहे ?