शिवसेना – संभाजी ब्रिगेड युती म्हणजे ‘विनाशकाले विपरीतबुद्धी !’ – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती म्हणजे ‘विनाशकाले विपरीतबुद्धी’  असल्याची टीका केली आहे. ‘आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू’, असे उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती करतांना म्हटले आहे; मात्र भाजपने यावर जोरदार टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आता कुणीही युती करायला सिद्ध नाही, त्यांची अवस्था अशी झाली आहे की, आता ते सैराट मित्रमंडळाशीही युती करतील.’